Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

December 22, 2010

शास्त्रज्ञ


ह्युगो दि फ्रीस

:चार्ल्‌स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील म्हणण्याप्रमाणे गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे बघण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींच्या लागवडी करून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यातील अनुमानांवरून अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम मांडले.

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल:
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (३ मार्च १८४७, २ ऑगस्ट १९२२) यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी.बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसर्‍या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली.

दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आल

जानकी अम्मल:
एडवालेथ कक्कट जानकी अम्मल या भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ होत. जन्मः इ.स. १८९७ मध्ये केरळ येथिल वेलीचेरी मध्ये. मृत्यु: इ.स. १९८४. इंग्लंड येथे कार्यरत असतांना, वनस्पतीशास्त्रातील ज्ञान आणि कार्य यांची महती ऐकून स्वत: जवाहरलाल नेहरूंनी तिला भारतात परत येऊन ‘बोटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ची पुनर्रचना करण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार त्या भारतात आल्य

इ.स. १९२५ बार्जुर शिष्यवृत्ती मिळवून मिशिगन अमेरिका येथून एम.एस्सी. पदवी घेऊन ती भारतात परत.
इ.स. १९३१ पुन्हा मिशिगनला उच्चशिक्षण व तेथून डॉक्टर ऑफ सायन्स ही उच्च पदवी घेऊन भारतात परत.
इ.स. १९४० लंडनच्या ‘जॉन इन्स हॉर्टिकल्चरल इन्स्टिटय़ूट’मध्ये वनस्पती-पेशी संशोधन उपशास्त्रज्ञ म्हणून काम केले.
इ.स. १९४५ पासून इ.स. १९५१ पर्यंत विल्से येथील रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटीत वनस्पतीपेशी-शास्त्रज्ञ म्हणून काम केले.


इ.स. १९४५ इंग्लंडमध्ये उद्यान वनस्पतींच्या पेशींतील गुणसूत्रांचा अभ्यास केला व त्यानुसार साली ‘क्रोमोसोम अ‍ॅटलास ऑफ गार्डन प्लांट्स’ हा प्रबंध सी. डी. जर्लिग्टन यांच्या साह्याने प्रसिद्ध केला.
पुरस्कार-
-इ.स. १९५७ पद्मश्री
युनिव्हॅर्सिटी ऑफ मिशिगन पुरस्कार