Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

December 20, 2010

सर्वसाधारण माहिती:महाराष्ट्र (MPSC-PREPARATION )

मेळघाट अभयारण्य
महाराष्ट्राच्या प्रमुख अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा असून या रांगांच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्य आहे. चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्य़ाघ्रप्रकल्प आहे. ह प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे.
---
बीड कनकालेश्वर् मन्दिर परळी वैजनाथ-बारा ज्योतिर्लिन्गापैकि यक्(जिल्हा-बीड)
शेगाव येथे संत श्री गजानन महाराज समाधि आहे. सिंदखेडराजा येथे छत्रपति शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाउचा जन्म झाला.

लोणार येथे उल्कापातामुळे तयार झालेले जगप्रसिध्द सरोवर आहे.(बुलढाणा जिल्हा)

बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग "नागनाथ" हे पांडवकालीन मंदिर आहे(हिंगोली जिल्हा)

सिंहगड-पुण्यापासून अंदाजे ३०-३५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला नावाप्रमाणेच भक्कम आहे. तानाजी मालुसरे यांच्या सिंहासारख्या कामगिरीमुळे मूळच्या कोंडाणा किल्ल्याचे नाव 'सिंहगड' झाले. गडावरील देव टाके थंड आणि गोड पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. गडावर राजाराम महाराज यांची समाधी आणि तानाजी मालुसरे यांचे स्मारक आह

भुलेश्वर:पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. वर भुलेश्वर हे देवस्थान आहे. हे बहुधा पांडवकालीन असावे. मूर्तिकाम पाहण्यासारखे आहे. लढायांच्या धामधुमीत बर्‍यायाच मूर्तींची तोडफोड झालेली दिसते. गणपतीची स्त्री रूपातील भारतातील कदाचित एकुलती मूर्ती या मंदिरात आहे.

कार्ला लेणी:पुण्यापासून अंदाजे ४० किलोमीटरवर वर कार्ल्याची प्रसिध्द लेणी आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकातील आहेत. ही बौद्ध लेणी म्हणजे स्थापत्यशास्त्राचे एक अप्रतिम उदाहरण आहे. 
भीमाशंकर
भीमाशंकर हे भारतातील पुणे जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणावरील सर्वात प्रसिद्ध गोष्ट आहे म्हणजे येथील ज्योतिर्लिंग मंदीर. भारतातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक येथे आहे. येथील ज्योतिर्लिंगामधून भीमा नदी उगम पावते जी पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे.

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात विविध प्रकारचे प्राणी पक्षी आढळतात.
अक्कलकोट स्वामी समर्थ भक्तांसाठी प्रसिध्द आह (सोलापूर).
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे 

बारा ज्योतिर्लिंग मंदिरे:सोरठी सोमनाथ • नागेश्वर •महांकालेश्वर • श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन • भीमाशंकर • ओंकारेश्वर • केदारनाथ • विश्वेश्वर •त्र्यंबकेश्वर • रामेश्वर • घृष्णेश्वर • वैजनाथ