Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

December 24, 2010

जागतिक वारसा स्थान(युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या यादीतील स्थान.)


आग्रा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश
फतेपूर सिक्री, उत्तर प्रदेश
ताज महाल, आग्रा, उत्तर प्रदेश
गोव्यातील चर्च व इतर इमारती
सांची स्तूप, मध्य प्रदेश
खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश
भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश
चांपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
एलेफंटा केव्हस/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
अजिंठा-वेरूळची लेणी, महाराष्ट्र
चोल राजांची मंदिरे, तामिळनाडू
महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडु
हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
कोणार्क सूर्य मंदीर, कोणार्क, ओरिसा
महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तरांचल
कुतुब मिनार, दिल्ली
लाल किल्ला, दिल्ली
हुमायूनची कबर, दिल्ली
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल