Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

August 28, 2010

Geographical Information Of Maharashtra

                                 Geographical Information  Of Maharashtra
 
                            *महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले*
ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड
रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे
रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड
सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड
पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड
नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई-
औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद)
कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड
अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड
अकोला - नर्नाळा
सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड,

                            *महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिरे*

लेण्या ठिकाण/जिल्हा
अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद
एलिफंटा, घारापुरी - रायगड
कार्ला, भाजे, मळवली - पुणे
पांडवलेणी - नाशिक
बेडसा, कामशेत - पुणे
पितळखोरा - औरंगाबाद
खारोसा, धाराशीव (जैर) - उस्मानाबाद


                             *महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे*

जलाशय/नदी स्थळ/जिल्हा
जायकवाडी - बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
गंगापूर - (गोदावरी) नाशिक
राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
कोयना शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
उजनी - (भीमा) सोलापूर
तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
यशवंत धरण - (बोर) वर्धा
मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
खडकवासला - (मुठा) पुणे
येलदरी - (पूर्णा) परभणी
बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड


                             *महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे*

खनिज जिल्हे
दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी
(यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग)
मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा)
तांबे - चंद्रपूर, नागपूर
चुनखडी - यवतमाळ
डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ
क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
कायनाईट - देहुगाव (भंडारा)
शिसे व जस्त - नागपूर


                        *महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे*

औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा
पारस - अकोला
एकलहरे - नाशिक
कोराडी, खापरखेडा - नागपूर
चोला (कल्याण) - ठाणे
बल्लारपूर - चंद्रपूर
परळीवैजनाथ - बीड
फेकरी (भुसावळ) - जळगाव
तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई
भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड
कोयना (जलविद्युत) - सातारा
धोपावे - रत्नागिरी
जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी


                                           *महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग*

लघुउद्योग ठिकाण
हिमरुशाली - औरंगाबाद
पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक)
चादरी - सोलापूर
लाकडाची खेळणी - सावंतवाडी
सुती व रेशमी कापड - नागपूर, अहमदनगर
हातमाग साडय़ा व लुगडी - उचलकरंजी
विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर
काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी
रेशमी कापड - सावळी व नागभीड (चंद्रपूर),
एकोडी (भंडारा)


                  *महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण*

विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई
पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर
विद्यापीठ (१९२५)
कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती
विद्यापीठ (१९८३)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद
मराठवाडा विद्यापीठ (१९५८)
शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड)
विद्यापीठ (१९८९)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर)
विद्यापीठ (१९९८)
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर

 
                                *महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था*

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)

 
             *महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे*


कवी/साहित्यिक टोपण नावे
कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडे - अनिल