पुण्याची भगिनी शहरे:
ही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत -
ट्रोम्सो, नॉर्वे
ब्रेमेन, जर्मनी
सान होजे, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
फेरबँक्स, अलास्का, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL), आयुका (IIUCA), आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट (ARI)--->आघारकर संशोधन संस्था,पुणे ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानीत ऎटोनोमस संस्था असून ती पुणे विद्यापीठ,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी शी संलग्न असून त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्यूत्तर व पी एच डी राबवते. त्या शिवाय जैवविज्ञानाशी संबधीत विवीध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने संशोधन प्रकल्प राबवते.
आघारकर संशोधन संस्थेची- Agharkar Research Institute (ARI)-स्थापना १९४६ मध्ये महाराष्ट्र ऍसोसिएशन फॉर कल्टीव्हेशन ऑफ सायन्सेस (MACS) नावाने झाली.१९९२ मध्ये संस्थापक संचालक प्रा.एस.पी.आघारकर यांचे नाव देण्यात आले.
, सी-डॅक (C-DAC), राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (NIV), राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था (NCCS), यशदा, भांडारकर संशोधन संस्था, द्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC-Grapes), कांदा आणि लसुण- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC- Onion and Garlic), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भारतिय विज्ञान आणि संशोधन संस्था (IISER), ईर्षा (IRSHA), वणस्पती सर्वेक्षण संस्था (BSI), सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज (AFMC), भलीमोठी मीटरवेव रेडिओ दुर्बीण (GMRT) सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.
पुणे हे महाराष्ट्रातील व भारतातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे
. कमिन्स इंडिया लिमिटेड, टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड,फोर्स मोटर्स लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९० च्या दशकात केपीआयटी कमिन्स , इन्फोसिस,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,विप्रो,सिमँटेक,आयबीएम,कॉग्निझंट सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारतातील एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून विकसित होत आहे.
पर्यटन स्थळे
पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड किल्ला, खडकवासला धरण, राजा दिनकर केळकर संग्रहालय, पानशेत धरण, बालगंधर्व रंगमंदिर, लाल महाल, आगाखान पॅलेस, सारसबाग, विश्रामबाग वाडा, कात्रज सर्प उद्यान,महात्मा फुले वाडा, फिल्म आणि टेलीविजन इंस्तीट्युट, पाताळेश्वर मंदिर, बंड गार्डन, शिंदे छत्री.
पुण्यातील महत्वाच्या कंपन्यांची मुख्यालये -
बजाज ऑटो लिमिटेड
कमिन्स इंडिया लिमिटेड
बॅंक ऑफ महाराष्ट्र
पर्सिस्टंट सिस्टम्स
नीलसॉफ्ट
पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वात मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स ,अल्फा लव्हाल, सँडविक एशिया, थायसन क्रुप (बकाऊ वूल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्हज् इंडिया, फोर्ब्स मार्शल, थर्मेक्स इत्यादी.
विद्युत व गृहपयोगी वस्तू निर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात स्थित आहेत. अनेक मध्यम व लहान उद्योग पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे त्यामुळे जवळच्या जिल्ह्यातील अनेक उद्योग निर्यात करु लागले आहेत.
पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते.