Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

December 1, 2010

हे आपणास माहीत आहे का?



...की तारामाशांना मेंदू नसतो ?

...की खेळातील फाशांच्या विरुद्ध बाजूंवरील आकड्यांची बेरीज ७ असते ?

...की घरातली माशी फक्त १४ दिवस जगते ?
...की दक्षिण अमेरिकेतील खवलेमांजर दिवसाला ३०,००० पेक्षा जास्त मुंग्या खाते ?
...की ब्रिटनच्या भोवती १०४० बेटे आहेत ?
...की सूर्यमालेतील फक्त शुक्र ग्रह घडाळ्याच्या काट्यांच्या दिशेने फिरतो व बाकीचे सर्व विरुद्ध दिशेने फिरतात ?
...की मृत समुद्र हा समुद्रसपाटीपासून सुमारे ३६५ मी. खाली आहे ?
...की एस्किमो लोक अन्न गोठण्यापासून वाचविण्यासाठी शीतकपाटाचा (फ्रीज) वापर करतात ?

...की एकाच परीघाच्या सर्व आकारांमध्ये वर्तुळाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त असते ?
..की भारतात पहिली प्लॅस्टिकची पिशवी इ.स. १९८५ साली वापरण्यात आली ?

..की प्लूटोचे खगोलशास्त्रीय चिन्ह हे प्लूटो (रोमन लिपी: Pluto) व पर्सिव्हाल लॉवेल (रोमन लिपी: Percival Lowell) यांच्या अद्याक्षरांची आकृतीने बनले आहे.

की सगळ्या बाँबांचा बाप हा जगातील सगळ्यात मोठा विस्फोटक बाँब आहे ?

...की उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला, तर तो त्याच्यावर थुंकतो ?

...की ताजमहाल बनविताना सुमारे १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता ?

...की कोल्हा (Jackal) व खोकड (fox) हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत ?

...की डासांना दातसुद्धा असतात ?

...की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते ?

...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात ?

...की शार्क माशांना माणसाला माहीत असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही ?

...की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे ?

...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत ?

...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात ?

...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात ?

...की थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे ?

...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही ?

...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ?

...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात ?

...की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात ?

...की सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात ?

...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही ?

...की सर्वसाधारणपणे माणूस कोळ्याला जितका भीतो तितका मरणाला भीत नाही ?

...की शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ ?

...की हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही ?

...की हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते ?

...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे ?
...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत ?

...की युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते ?

...की भारतात २२ शासकीय राजभाषा आहेत पण एकही राष्ट्रभाषा नाही ?

...की १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे ?