महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणातील प्रमुख बाबी:
'राज्य सांस्कृतिक निधी' ची स्थापना. - शासकीय अर्थसहाय्य आणि लोकसहभाग यातून; या निधीतून केवळ शासकीय तरतुदींतून सहजगत्या न राबविता येणाऱ्या योजना /उपक्रम राबविले जातील.
मराठी भाषा विभाग स्थापन केला जाईल.
भाषा सल्लागार मंडळ स्थापन होणार.
मुंबईत भाषाभवन उभे राहणार.- भाषा आणि साहित्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी.
मराठीसाठी 'प्रमाण भाषा कोश ' मंडळ स्थापन होणार.
प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह.
जिल्हा पातळीवर खाजगी सहकार्याने नाट्यगृह.
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज (नियोजित स्थळ: अरबी समुद्रात), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चैत्यभूमी ), महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक उभे राहणार.
प्रत्येक महसुली विभागात, विभागीय पातळीवर 'कलासंकुल' उभे करणार.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक किंवा त्यांच्या नावाने अध्यासन रशियात स्थापण्याचा प्रयत्न करणार.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठ (अमेरिकेत) तर महर्षी वि.रा.शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड (ब्रिटन ) विद्यापीठात अध्यासन निर्माण करण्यात शासन प्रयत्न करेल.
शिवकालीन किल्ल्यांच्या ठिकाणी "शिवकिल्ले मालिका योजना " तयार करणार.
पैठण येथे संतपीठ
महाराष्ट्र ललित कला अकादमीची स्थापना.
मराठी बोली भाषा अकादमी उभारणार.
महाराष्ट्र प्रगत अध्ययन केंद्र नावाची स्वायत्त संस्था उभी राहणार- 'महाराष्ट्रविद्या' या नवीन ज्ञानशाखेच्या अभ्यासासाठी.