CURRENT AFFAIRS GK MPSC-UPSC TESTS PRILIM EXAM SHORTFORMS NEWS DAILY UPDTED GK
Indira Gandhi--->
October 5, 2010
कृषीविषयक घटक
मत्स्योत्पादन : महाराष्ट्रात ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. जगात माशांच्या २१,०००, भारतात १६०० व महाराष्ट्रात सुमारे ६०० जाती आढळतात.
० ठाणे जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यात शंखोदर बंदर असून आकाराने मुंबई बंदराच्या चौपट मोठे आहे. येथे पवित्र तिर्थक्षेत्र असून समुद्रात जिवंत शंख सापडतात. गोडय़ा पाण्याचे कुंड आहे. भारत सरकारला परकीय चलन मिळवून देणारा शिवंड (लॉब्सटर) मासा याच ठिकाणी आढळतो.
० महाराष्ट्राच्या भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत योग्य कोळंबीची जात म्हणजे जम्बो कोळंबी. याच कोळंबीला रायगड व ठाणे जिल्ह्य़ात ‘पोची’ या नावाने ओळखतात तर पश्चिम महाराष्ट्रात ‘झिंगा’ या नावाने ओळखतात. जागतिक बाजारपेठेत ही कोळंबी ‘स्कॅपी’ या नावाने ओळखली जाते.
० कोळंबीचे मुख्य गुणधर्म- प्रजननाच्या वेळी होणारे स्थलांतर, नदीच्या पात्रातून, खाडीमधून जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या हंगामात ही कोळंबी समुद्राकडे पोहत येते. खाडीच्या मुखावर ही कोळंबी थव्यांनी येताना आढळते. नदीच्या तोंडाशी, खाडीमध्ये किनाऱ्यात हिरवळीच्या आडोशाने ती आपली पिल्ले सोडतात. खाडीच्या निमखाऱ्या पाण्यामध्ये ही पिल्ले जगू शकतात. काही दिवसांनी त्याचे छोटय़ा कोळंबीत रूपांतर होते, ज्याला कोळंबी बीज म्हणतात.
० महाराष्ट्र कोळंबी बीजनिर्मिती करणारे एकमेव राज्य आहे.
० महाराष्ट्रात सद्यस्थितीत ११९ कोळंबी प्रकल्प आहेत.
० खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- बोंबील (बॉम्बे डक), पापलेट, सुरमई, बांगडा, वाम, हैद, कोळंबी, मांदेली, शेवंड, रावस, दाढा, सौंदाढा, ताठमासा इ.
० निम खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- जिताडा, ë2;ेणवी, थाऊनस,
बोई, झिंगे इ.
० गोडय़ा पाण्यातील मासे- कटला (विदर्भात तांबरा असे म्हणतात), रोहू, कोळंबी, चंदेरी, तिलापिया, मरळ, काणोसी, गवत्या, रावस इ.
० परदेशातून आणलेल्या जाती- स्केलकार्प, मिररकार्प, लेदरकार्प, गवत्या (ग्रासकार्प- हाँगकाँग), तिलापिया (आफ्रिका), कटला, रोहू इ.
० हेरिंग, मॅकरेल, सार्डिन, टूना या जातीचे मासे सागरपृष्ठीय मासे म्हणून ओळखले जातात.
० ग्रामीण भागात मलेरिया प्रतिबंधक म्हणून डासाच्या अळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी गप्पी मासे वापरले जातात.
० हैद व तारलीचे तेल रक्तवाहिनीच्या विकारावर व हृदयविकारावर वापरले जाते.
० माश्यात आढळणारे घटक- ७० ते ८० टक्के पाणी, १६ ते २५ टक्के प्रथिने (पचनास हलके) .१ ते २.२ टक्के स्निग्ध पदार्थ, .८ ते २ टक्के क्षार व खनिज पदार्थ, अ व ड जीवनसत्त्व.
० जो मनुष्य वर्षांतून कमीत कमी ३० दिवस मासेमारी करतो, त्या व्यक्तीला मच्छिमार म्हणतात.
० संपूर्ण सागरी आर्थिक क्षेत्र म्हणजे त्या देशाच्या किनाऱ्यापासून २०० सागरी मैलपर्यंतचे क्षेत्र होय.
भारतातील कृषी क्रांती :
हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ पित क्रांती - तेलबिया
लाल क्रांती - मांस उत्पादन रजत क्रांती - अंडी उत्पादन
सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन गोल क्रांती - बटाटा उत्पादन
करडी क्रांती - खत उत्पादन
० शेतमालाच्या भावाची निश्चित पातळी ठरविण्यासाठी शासकीय पातळीवर सन १९६५ साली कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली.
० विदर्भातील शेतकऱ्यांच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी शासनाने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नियुक्त केली.
आपला भारत कृषी प्रधान देश असून शेतीमध्ये रोज १५ ते १६ तास काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा देश आहे. भारतातील व आपल्या महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आज देशातील जवळपास ६५ ते ७० टक्के लोकसंख्या कृषी व संलग्न उद्योगांवर अवलंबून आहे. देशाच्या व राज्याच्या सर्वागीण विकासामध्ये ‘कृषी’ हा आधार मानला जातो. त्यामुळे देशातील व राज्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थ्यांना व प्रशासकाला शेतीविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे.
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय :
० शेतीला संपूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन व दुग्धव्यवसाय. सध्या दोन्ही क्षेत्रांत जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. जगाच्या एकपंचमांश पशुधन भारतामध्ये आहे. जगातील एकूण म्हशींपैकी ५३.५ टक्के म्हशी भारतात आहेत.
० भारतात सर्वात जास्त पशुधन उत्तर प्रदेशात आहे.
० भारतामध्ये पशुगणना दर पाच वर्षांनी केली जाते.
० भारतात विविध भागांतील मिळून एकूण २६ प्रकारच्या गाईंच्या जाती आहेत. गाईंच्या दुधाळ जाती- सहिवाल, गीर, लालसिंधी, थरपारकर इ.
० गाईच्या शेतीच्या कामास उपयुक्त जाती- खिलार, अमृतमहाल, नागोरी, म्हैसुरी, कंगायम;
० दूध उत्पादन व शेतीकाम दुहेरी उद्देशीय जाती- देवणी, हरियाणी, कॉकरेज (सर्वात मोठी), कृष्णाकाठी, ओंगोले, थरपारकर इ.
० गाईंच्या विदेशी जाती : जर्सी, होलस्टेन, फ्रिजिअन, ब्राऊन स्वीस, रेड डॅनिश, शार्लोटा (मांस).
० म्हशीच्या जाती- जाफराबादी (सर्वात मोठी व सर्वात जास्त दूध देणारी, भावनगरी म्हणून ओळखतात), सुरती (दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जास्त- ८.५%), मेहसाना (सुरती व मुव्र्हा जातीच्या संकरातून निर्माण), नागपुरी, पंढरपुरी (कर्नाटकात धारवाडी म्हणून ओळखतात), निली रावी, तोडा, तराई, कालाहंडी इ.
० शेळी- गरीबाची गाय म्हणून ओळखली जाते. शेळीमध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त शेळ्या आहेत.
० दुधाकरिता उपयुक्त देशी शेळीच्या जाती- जमुनापुरी, बारबेरी, मलबारी, झकराना.
० महाराष्ट्रातील शेळीच्या जाती- सुरती, उस्मानाबादी, संगमनेरी.
० विदेशी दुधाच्या शेळीच्या जाती- जसानेन, न्युबीयन, दमास्कस, ब्रिटिश अल्पाईन.
० अंगोरा शेळीच्या लोकरीस मोहेर म्हणतात. पश्मिना हा मऊ केसांचा थर काश्मिरी शेळीमध्ये आढळतो. शेळीचा गर्भधारणा काळ १५० दिवसांचा असतो.
० मेंढीच्या जाती- नेल्लोरे, शहाबादी, बिकानेरी, मारवाडी, चोकला, गरेझ, दख्खनी, भाकरवाल, लो 61;ी, काठियावाडी, मेरीनो (लोकरीसाठी उत्तम जात), गड्डी इ.
० कोंबडय़ांच्या जाती- ब्रह्मा (झुंजीसाठी प्रसिद्ध), व्हाईट लेग हॉर्न (जगात सर्वाधिक जास्त अंडी देणारी), ब्लॅक मिनोर्का, ऱ्होड आयलंड (मांस व अंडी देणारी)
० दुधातील घटक- पाणी, लॅक्टोज, सिरम अॅल्ब्युमिन, सिरम ग्लोब्युलिन, केसीन, नॅचरल फॅटस्, फॉस्फोलिपिडस्, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, फॉस्फोरस, सोडियम, पोटँशियम, क्लोराईड, सायट्रिक आम्ल इ.
० दुधापासून तयार केले जाणारे पदार्थ- दही, ताक, लोणी, मलई, तूप, खवा, चीज, पनीर, श्रीखंड इ.
You might also like सामान्य ज्ञान