Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

October 1, 2010

समित्या व आयोग




किरीट पारीख समिती - पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नियुक्त केलेली समिती
* अभिजित सेन समिती - देशातील अन्नधान्य किमतीवर वायदे बाजाराचा कितपत परिणाम होतो हे तपासण्यासाठी नेमण्यात आली.
* डॉ. यु. म. पठाण समिती - महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याच्या समावेशाकरिता नेमण्यात आलेली समिती
* माधवराव चितळे समिती - मुंबईतील पूरस्थितीवर अभ्यास करण्याकरिता
* डॉ. अभय बंग - राज्यातील कुपोषित बालमृत्यू मूल्यमापन करण्याकरिता
* न्या. राजेंद्र सच्चर आयोग - मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीच्या मागासलेपणाची कारणे शोधण्यासाठी
* रघुनाथ माशेलकर समिती - बनावट औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे
* शरद पवार समिती - शीतपेयातील हानिकारक घटक शोधण्यासाठी
* इंद्रजित गुप्ता समिती - निवडणुकीतील भ्रष्टाचार शोधण्यासाठी
* अरुण बोंगिरवार समिती - केंद्रीय नागरी सेवेत महाराष्ट्रीय तरुणांचे प्रमाण वाढविण्याकरिता
* कुरूदीपसिंह आयोग - लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याकरिता
* डॉ. नरेंद्र जाधव समिती - विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता व कारणे, उपाययोजना शोधण्याकरिता
* आर. के. राघवन समिती - शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगचे प्रकरण रोखण्याकरिता
* न्या. नानावटी आयोग - गोध्रा हत्याकांड (गुजरात) चौकशी करण्याकरिता
* न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग - सहाव्या केंद्रीत वेतन आयोगाकरिता
* यशपाल समिती - देशातील उच्च शिक्षण धोरणात आमूलाग्र सुधारणा सुचविण